जनसुविधा अंतर्गत खा. नारायण राणे यांच्याकडून १५ लाखाचा निधी मंजूर
राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील तुळसवडे मुख्य रस्त्यापासून सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तुळसवडे गावचे उपसरपंच संजय कपाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
तसेच तुळसवडे मासुरले घर ते सार्वजनिक स्मशानभूमी जाणारा रस्ताकामी कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांनी जनसुविधा अंतर्गत १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. याकामी माजी खासदार व सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, विद्यमान आमदार निलेश राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी माजी ग्रां. प. सदस्य शितल कपाळे, प्रकाश आरावकर, गाव प्रमुख सदाशिव प्रभुदेसाई, प्रकाश आडिवरेकर, प्रकाश सुतार, सुभाष कानडे, वर्धमान कराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.












