विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार आयाम राजापूर प्रखंड यांचे वतीने राजापूर तालुक्यातील धोपेश्वर ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिर येथे रविवार दि.२८.१२.२०२५ रोजी सायंकाळी ठिक ४ ते ५ यावेळेत श्रीस्वामी श्रध्दानंदजी बलीदान स्मरण दिन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प.पू.विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांचे श्री नवलादेवी मंदिरात आगमन होताच धोपेश्वर मसुरकरवाडी येथील महिलांनी पाद्यपूजा व आरती ओवाळून औक्षण केले .
या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख अतिथी प.पू.विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून व श्री स्वामी श्रध्दानंदजी व भारतमाता यांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी धोपेश्वर गावच्या पोलीस पाटील सौ.प्रतिभा लिंगायत,नवलादेवी मंदिराचे पुजारी कॄष्णा गुरव ,गावकार श्री सिताराम मसुरकर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,मातॄशक्ती, जबाबदार कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर विश्व हिंदू परिषद प्रथेप्रमाणे सुरवातीला दिर्घ श्वास घेऊन तीन वेळा ॐकार, एकात्मता मंत्र,श्रीराम धुन, यानंतर हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवूया हे सामुहिक गीत गोठणकर सर यांनी सांगितले.यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना गोठणकर सर यांनी केली.यावेळी परिचय व स्वागत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प.पू.विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांचे श्री संदिप मसूरकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अधिवक्ता सचिनजी रेमणे यांनी श्रीस्वामी श्रध्दानंदजी यांचे जीवनपट त्यांचे कार्य व त्यांनी अनेक संकटांवर मात करत हिंदू धर्म टिकवण्यासाठी जे हिंदू धर्मातून ईतर धर्मात जात होते त्यांचे परावर्तित करुन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचे महान कार्य स्वामी श्रध्दानंदजी यांनी केले यासाठी त्यांना बलीदान द्यावे लागले पण त्यांनी आपले कार्य जीवाच्या अंत: पर्यंत सुरु ठेवले.
हिंदू धर्मासाठी बलीदान देणा-र्यां महान तपस्वी संत श्री स्वामी श्रध्दानंदजी यांचे बलिदानाचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी प्रमुख वक्त्यांनी बोलताना सांगितले.
आपल्याला मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक करायचे असेल तर आध्यात्मा शिवाय कोणताही मार्ग नाही.
आपल्याला या जगात सुखी आनंदी राहायचे असेल तर नियमित देवाचे नामस्मरण केलं पाहिजे.देवावर आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे.हिंदू संतांनी केलेली तपश्चर्या त्याग बलीदान यामुळेच आजपर्यंत हिंदू धर्म टिकून आहे.आपण सर्वांनी संतांचे मार्गदर्शनाखालीच हिंदू कोणत्याही परिस्थितीत धर्मांतरित होणार नाही आणि जर धर्मांतरीत झाला तर त्याला पुन्हा हिंदू धर्मात परावर्तित करण्याचे श्री स्वामी श्रध्दानंदजी यांनी सुरू केलेले पवित्र कार्य आपण यापुढे सुरुच ठेऊया असे प्रतिपादन प.पू.विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांनी उपस्थितांना आशिर्वतनात बोलताना केले.
यानंतर भारतमातेची सामुहिक आरती, उद्घोष, प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद राजापूर प्रखंड मंत्री संदेश टिळेकर, सहमंत्री गोठणकर सर,मातॄशक्ती विभाग संयोजिका सौ.माधवी हर्डीकर,सत्संग प्रमुख गणपत बुचडे, बजरंग दल सहसंयोजक संदिप मसूरकर,गोरक्षाप्रमुख अभिषेक पवार,मातॄशक्ती संयोजिका सौ.अल्काताई पाटणकर, सहसंयोजिका सौ.सुप्रिया रहाटे, सौ.व श्री डाॅ.शेखर पाध्ये,प्रकाश बांदिवडेकर, प्रतिभा मराठे तसेच विश्व हिंदू परिषद सर्व जबाबदार कार्यकर्ते पदाधिकारी व धोपेश्वर गाव व परिसरातील हिंदू बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.













