नाटे विभागीय पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मिठगवाणे पोलीस पाटील गजानन भोगले यांची निवड

राजापूर प्रतिनिधी राजापूर तालुक्यातील नाटे विभागीय पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मिठगवाणे पोलीस पाटील गजानन भोगले यांची तर उपाध्यक्षपदी साखरचे पोलीस पाटील रोहिदास कांबळी, सचिवपदी कार्शिंगे पोलीस पाटील राजू कार्शिंगकर यांची निवड झाली आहे.
नाटे विभागीय पोलीस पाटील संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नाटे येथे साखरी नाटे ग्रामपंचायत सभा सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. पुढील तीन वर्षाच्या काळासाठी ही नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे.
यामध्ये अध्यक्ष गजानन गोपाळ भोगले पोलिस पाटील मिठगवाणेण् उपाध्यक्ष रोहीदास गोविंद कांबळी पोलीस पाटील साखर, सचिव. राजू सिताराम कार्शिकर पोलीस पाटील कार्शींगे, सहसचिव :- सौ. रंजीता रोशन लाड, खजीनदार आतिष पांडूरंग भोवड पो. पा. नावेदर, हिशोब तपासणीसः- सौ. निधी विकास बांधकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर कार्यकारणी सदस्यपदी महेश विलास हळदणकर, शिवप्रसाद सुरेश दसुरी, मिरंजन विकास लिंगायत, गीत गणेश पावसकर, सान्वी सचिन सोडये, फैजान जिक्रिया वाडकर, नितीन जयवंत कदम, सोनाली मनिष नार्वेकर यांची तर सल्लागार प्रमोद पुरुषोत्तम सुतार, राजन पशुराम शिर्सेकर, कायदेतज्ञ प्रमोद कृष्णा वारिक यांची निवड करण्यात आली आहे. या नुतन कार्यकारणीचे अभिनंदन होत आहे.