आंतरराष्ट्रीय स्तरावरील एसओएफ जनरल नॉलेज या स्पर्धा परीक्षेमध्ये श्रीश करगुटकरचे सुयश

रिगल सीबीएसई स्कूलची आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी
मोडकाआगर वार्ताहर : 
रिगल सीबीएसई स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील एसओएफ जनरल नॉलेज या स्पर्धा परीक्षेमध्ये श्रीश करगुटकर या गुणवंत वि‌द्यार्थ्याने अत्यंत उल्लेखनीय व अभिमानास्पद यश संपादन केले आहे. जगभरातील अनेक लाखो वि‌द्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत श्रीशने आपली बुद्धिमत्ता, व्यापक ज्ञानसंपदा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय मेरिट लिस्टमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यापुरते मर्यादित नसून शाळा, परिसर व संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरत आहे.

सायन्स ऑलिम्पियाडमधील जनरल नॉलेज स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानाची कसोटी पाहणारी मानली जाते. या परीक्षेमध्ये चालू घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक विचार, तसेच जागतिक घडामोडी यांचा समावेश असतो. केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता विचारक्षमतेची व आकलनशक्तीची परीक्षा घेणाऱ्या या स्पर्धेत उत्कृष्ट गुण मिळवणे हे मोठे आव्हान मानले जाते. अशा कठीण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मेरिटमध्ये स्थान मिळवणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
रिगल सीबीएसई स्कूलमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. योगामध्ये रिगलची विद्यार्थिनी सलोनी शिर्के हिने राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश मिळविले आहे. क्रीडा, अभ्यास, स्पर्धापरीक्षा यासाठी अनेक उज्जवल भवितव्य असणारे वि‌द्यार्थी येथे घडत आहेत. शाळेतील अनुभवी शिक्षकवर्ग, शिस्तबद्ध अभ्यासपद्धती, वैयक्तिक मार्गदर्शन, आधुनिक शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिला जाणारा भर शाळेत केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न देता स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, व्यक्तिमत्त्व विकास व मूल्याधारित शिक्षणावर विशेष लक्ष दिले जाते. या यशामुळे रिगल सीबीएसई स्कूल ही शाळा गुणवत्तेची हमी देणारी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध असलेली शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळून भविष्यात आणखी उच्च पातळीवर यश संपादन करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

श्रीशला मिळालेल्या या उत्तुंग यशाबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के , संचालक मंडळ, शाळा सल्लागार समिती मंडळ, समन्वयक अमृता इदाते , शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी श्रीशचे अभिनंदन केले असून त्याला उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.