गुहागर प्रतिनिधी:
राजगुरूनगर आगाराची एसटी बस प्रवाशांना गुहागर येथे सोडून परत जात असताना मोडकाघर धरणाजवळ एसटी बसची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. या अपघातात असगोली येथील चैतन्य जाकळे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
बस गुहागरहून परतीच्या प्रवासाला जात असताना मोडकाघर धरणाजवळ हा अपघात झाला. धडकेनंतर दुचाकीस्वार चैतन्य जाकळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. अपघाताबाबत अधिक माहिती व तपास गुहागर पोलीस घेत आहेत.













