देवगड–जामसांडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया सुरू

देवगड–जामसांडे नगरपंचायतीच्या विविध विषय समितींच्या सभापती पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून, चार पदांसाठी चारच अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

यामध्ये बांधकाम समितीच्या सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी तन्वी चांदोस्कर, तर स्वच्छता समितीच्या सभापतीपदी निवृत्ती ऊर्फ बुवा तरी यांची निवड निश्चित मानली जात आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षपदी मनीषा जामसांडेकर यांचीही बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

या निवडींबाबतचा अधिकृत निर्णय आज दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. सर्व पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.