​कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभापती निवड: भाजपच्या संजना म्हावळंकर यांची बिनविरोध निवड; दोन पदे रिक्त

​दोडामार्ग: प्रतिनिधी
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका संजना संतोष म्हावळंकर यांची आरोग्य व शिक्षण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मात्र, इतर दोन महत्त्वाच्या समित्यांसाठी अर्ज न आल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.

​नगरपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी निवडीबाबतची अधिकृत माहिती दिली.

​आरोग्य व शिक्षण सभापती: संजना संतोष म्हावळंकर (भाजप) – बिनविरोध निवड झाली आहे
​बांधकाम सभापती: पद रिक्त

​महिला व बालकल्याण सभापती: पद रिक्त (एकही नामनिर्देशन पत्र नाही)
​१७ सदस्य संख्या असलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे.