संतोष कोत्रे
लांजा –: लांजा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सावली सुनील कुरूप यांचा पदग्रहण सोहळा उद्या गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेल्या सावली सुनील कुरूप या दुसऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
महाविकास आघाडी आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचा पराभव करत सावली सुनील कुरूप यांनी विजय संपादन केला होता. त्यांचा हा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा उद्या गुरुवारी एक जानेवारी रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
या पदग्रहण सोहळ्याला लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष
तसेच लांज्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.










