नावळेची ईशा रावराणे सीएमए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

वैभववाडी l प्रतिनिधी :       नावळे येथील ईशा अभिजीत रावराणे सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

आय एम ए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट ही संस्था न्यू जर्सी अमेरिका येथे असून त्यांच्यामार्फत सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंट हा अभ्यासक्रम घेतला जातो. ज्याला संपूर्ण जगामध्ये मान्यता आहे.

कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाचे कम्प्युटर विभाग प्रमुख कै.डॉ. अभिजीत अरविंद रावराणे यांची कन्या ईशा अभिजीत रावराणे हिने ऑक्टोंबर 2025 रोजी सदर शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली.

सीएमए हा एक धोरणात्मक आर्थिक व्यावसायिक असतो. जो व्यवसायाचे नियोजन, कामगिरी, जोखीम आणि विश्लेषणावर लक्ष केंद्रित करून व्यवसाय निर्णयाचे मार्गदर्शन करतो. बजेटिंग अंदाज खर्च व्यवस्थापन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थेच्या आर्थिक आरोग्यासाठी संधी किंवा धोके ओळखण्यात संस्थेला मदत करतात. ईशा हिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.