केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंकडून पाठपुरावा
969.56 लाखांचा निधी मंजूर
पावसाळयानंतर कामे हाती घेणार
राजापूर (वार्ताहर): प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेल्या तालुक्यातील 969.56 लाखांच्या सात महत्वपुर्ण रस्त्यांच्या कामांची टेंडर प्रक्रीया पुर्ण झाली असून पावसाळयानंतर ही कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी दिली आहे.
या कामी प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली होती. मात्र निधीची मंजुरी होण्यासाठी ही कामे प्रलंबीत होती. त्यासाठी आपण माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरवा करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. नाम. राणे यांनी याबाबत केंद्रीय ग्रामिण विकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या कामांसाठी आवश्यक तो निधी मंजूर करून घेतला असल्याचे नागरेकर यांनी सांगितले.
राजापूर तालुक्यातील या सात कामांना निधी मिळावा म्हणून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यामध्ये तळवडे बौध्दवाडी ते इंजिनवाडी सहा किमी (478.80 लाख), ताम्हाणे मोरोशी ते केळवली 5.10 किमी रस्ता (422.35 लाख) ओणी तोरणवाडी बौध्दवाडी ते चिखलगाव बौध्ध्वाडी रोड 4.80 किमी रस्ता (381.82 लाख), नाटे ते आंबोळगड 5.40 किमी रस्ता (381.82 लाख), चिंचवाडी ते अणसुरे रस्ता 7 किमी (554.14 लाख), कळसवली चुनाकोळवण निवखोलवाडी रस्ता 5.50 किमी (438.45 लाख), वडवली ते वडदहसोळ रस्ता 6.65 किमी (531.11 लाख) या मंजूर रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.
या कामी प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली होती. मात्र निधीची मंजुरी होण्यासाठी ही कामे प्रलंबीत होती. त्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश साचिव निलेश राणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नाम. राणे यांनी याबाबत केंद्रीय ग्रामिण विकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या कामांसाठी आवश्यक तो निधी मंजूर करून घेतला आहे. आता या कामांची टेंडर प्रक्रीयाही पुर्ण झाली आहे. पावसाळयानंतर ही कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहीती श्री. नागरेकर यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची असलेली मागणी पुर्णत्वास जाणार असल्याने ग्रामस्थांतून नामदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री उदय सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांना धन्यवाद दिले आहेत.












