श्री बागेश्री देवीचा शनिवारी ३ जानेवारी रोजी यात्रोत्सव

लांजा (प्रतिनिधी): सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री बागेश्री देवीचा वार्षिक यात्रोत्सव शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील सोनार समाजाच्या वतीने श्री बागेश्री देवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.‌ या कार्यक्रमांतर्गत दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दहा देवीची यथासांग पूजा, मंत्रपुष्प त्यानंतर दहा ते दुपारी बारा देवीच्या सप्तशती पाठाचे वाचन, सायंकाळी सहा ते रात्र आठ या वेळेत मधला कुंभारवाडा भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.‌ रात्री ९ ते १.३० या वेळेत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
तरी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बागेश्री मंदिर उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.