भाजपाचे कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे उमेदवार
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – आडारी येथील सुपुत्र भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते मुकुंद उर्फ विशु पेडणेकर यांची कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
पेडणेकर यांनी माजी नगरसेवक म्हणून चांगले काम केले होते. त्यामुळेच भाजपने त्यांना यावेळच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली होती. त्यांच्या निवडीबद्दल वेंगुर्ले भाजप तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.











