खेड (प्रतिनिधी) – कोकणी मुस्लिम संघ व महिला विंग यांचा वार्षिक कॅलेंडर २०२६ चा उद्घाटन समारंभ शमशुद्दीन मुकादम यांच्या मुकादम लँडमार्क कार्यालयात उत्साहात पार पडला. या कॅलेंडरचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेवक आरिफ मुलाजी, तौसिफ खोत आणि रहीम साहिबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शमशुद्दीन मुकादम, रियाझ हमधुळे, नजीर भाई फिर्फीरे, अहमद कादिरी यांच्यासह कोकणी मुस्लिम संघाचे अध्यक्ष तजमूल बेग, कॅलेंडर प्रोजेक्ट चेअरमन दाऊद कादरी, माजी अध्यक्ष मुश्ताक मुकादम, सरफराज पांगारकर, संघाचे सल्लागार अॅड. परवेज महाडिक, उद्योजक अब्दुल कादिर, पत्रिक फहीम मोहीमतुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या कॅलेंडरमधून संघाच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. समाज एकजुटीने पुढे जाण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतात, असे मत उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कोकणी मुस्लिम संघाचे अध्यक्ष तजमूल बेग यांनी उद्घाटनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल शमशुद्दीन मुकादम यांचे विशेष आभार मानले.












