मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ जरीमरी व कुंभारमाठ येथील दोन्ही अंगणवाडींच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रामध्ये शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास माननीय सरपंच सौ. पूनम वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास महाविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) च्या कार्यकारिणीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका भक्ती मांजरेकर, अंगणवाडी सेविका तनुजा गावठे, अंगणवाडी मदतनीस श्रेया भोगावकर व अंगणवाडी मदतनीस हर्षिता डिचवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेकोटी कार्यक्रमातून सामूहिक सहभाग, सामाजिक एकोपा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन यांचा सुंदर प्रत्यय आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आपुलकी व एकतेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.













