संस्था परंपरा जपत, विद्यार्थी समाजाभिमुख, कर्तव्यात निष्णात बनविण्यात नेहमीच प्रयत्नशील— महेश (राजू) सावंत- पटेल.
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट व जुनिअर कॉलेज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न !
फोंडाघाट /कुमार नाडकर्णी-– शाळा हे विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी विद्या प्राप्त करण्याचे मंगलमय मंदिर आहे. आणि त्यामध्ये मिळणारे शिक्षण हे अर्थार्जनाबरोबर सामाजिक संस्कार मूल्य जपणारे असावे,तरच उद्याचे नागरिक सुजाण,सक्षम,आणि संस्कारक्षम होतील.गरिबीतून मोठ्या झालेल्या माणसांचे विचार मुला- मुलींना ऐकवावेत. विद्यार्थ्यांनी पुस्तककी ज्ञानाबरोबर,इतर विभागांमध्येही क्रियाशील असावे. जिद्द, मेहनत, चिकाटी, आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळते. हे सौदाहरण त्यांनी पटवून दिले. आपण शेतकरी कुटुंबातून असून या पदापर्यंत पोहोचलो आहे. समाजामध्ये आपल्या आई- वडिलांची मान खाली जाऊ न देता माणूस म्हणून जगता आले पाहिजे. असे मार्गदर्शक विचार सिंधू. जि.प.चे कार्य.अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी त्यांचे सह व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश सावंत-पटेल, सरपंच सौ. संजना आग्रे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी गवस, सचिव शेखर (अण्णा) लिंग्रस ,संचालक सदस्य संजय आग्रे ,रंजन नेरुरकर, प्राचार्य नरे, सौ चिंदरकरमॅडम, मुख्या.प्रसाद पारकर, नांदोस्कर ,दादा पारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते …
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते रांगोळी, चित्रकला, विज्ञान, वर्ग सजावट इ.प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विज्ञान विभागात ऋत्वी सावंत, पूर्वा पावस्कर पूजा घुले,अंतरा मरये,चित्रकला विभागात अथर्व वर्धम,यशोदा भोगले, रांगोळी विभागात प्रतीक्षा राणे, याज्ञिका हळदिवे वर्ग सजावट पाचवी अ आणि नववी अ इत्यादींनी बक्षीसे पटकावली ….
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी रवींद्र खेबुडकर यांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करताना ओळख करून दिली. यावेळी शाळेने वर्षभरात प्राप्त लक्षणीय यशाचा साभिमान उल्लेख केला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला ..
यावेळी संस्था आजवरच्या परंपरा जपत विद्यार्थी समाजाभिमुख आणि कर्तव्यात निष्णात बनवण्यात नेहमी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन करताना उज्वल यश संपादन केलेल्या मुला- मुलींचे चेअरमन राजू पटेल यांनी कौतुक करून, शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय आग्रे, सौ. संजना आग्रे,रंजन नेरुरकर, नांदोस्कर यांनी विद्यार्थी – विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना संस्थेचा गौरव केला. सूत्रसंचालन नारिंगकर व जोईल यांनी तर आभार प्रदर्शन फड यांनी केले …
सायंकाळी शेलापागोटे यांचे वाचन सर्वांनाच मौजमस्ती आणि आनंद देऊन गेला. सायंकाळी विविध गुणदर्शनाचा रंगारंग कार्यक्रमाचे उद्घाटन राजन नानचे – सोसायटी अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले. खेळातील प्राविण्य मिळवलेल्या मुला मुलींचा मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. त्यावेळी मुला- मुलींनी आपल्यातील कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करताना उपस्थितांचे आणि पालकांचे आणि मान्यवरांचे मनोरंजन केले आणि कौतुक मिळविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज रावराणे, सेजल हुंबे, आणि श्रेया कुबडे यांनी केले….











