मराठी पत्रकार परिषद शाखा लांजा तर्फे पत्रकार दिन साजरा

लांजा (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पत्रकार दिनाचे औचित साधून मराठी पत्रकार परिषद शाखा लांजा च्या वतीने आज मंगळवारी पत्रकार दिन हा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रहार कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, पदाधिकारी संजय साळवी, रवींद्र साळवी, संतोष कोत्रे, नासिर मुजावर, काशिनाथ चव्हाण तसेच सरपंच संघटनेचे पदाधिकारी संजय पाटोळे आदी उपस्थित होते.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १९३८ रोजी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. या दिवशी संपूर्ण राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेच्या कार्याला उजाळा देण्यात आला.