कणकवली भाजप उपाध्यक्ष सोनु सावंत यांना पितृशोक

सामाजिक कार्यकर्ते मधुकर सावंत यांचे हृदयविकाराने निधन

कणकवली दि.७ जानेवारी : वरवडे-फौजदारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर जयराम सावंत (७६)यांचे ह्दयविकाराच्या धक्याने बुधवारी सायंकाळी ७ वाजता दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मधुकर सावंत हे वरवडे गावातील धार्मिक, सांस्कृतिक कार्यात अग्रभागी असायचे. त्यांचा मनमिळावु स्वभाव असल्याने मित्र परिवार मोठा होता. त्यांना बुधवारी सायंकाळी घरी ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृतदेहावर गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वरवडे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली भाजप उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनु सावंत यांचे वडिल तर माजी पंचायत समिती सदस्या राधिका सावंत यांचे ते सासरे होत.