लांजा (प्रतिनिधी ) हम सबके सब हमारी हे ब्रीदवाक्य घेऊन तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी काम करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या दाभोळे आणि साखरपा विभाग अध्यक्षपदी सिकंदर युसुफ फरास यांची निवड झाली आहे.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटीची स्थापना झाल्यानंतर सिकंदर फरास हे गेली काही वर्षे संघटनेच्या विविध कामात सक्रियपणे काम करत होते त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक तसेच संस्थापक आणि कार्याध्यक्ष अखिल नाईक यांनी त्यांची साखरपा आणि दाभोळे विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष अखिल नाईक, सल्लागार परवेझ घारे, तालुका उपाध्यक्ष ताजुद्दीन मुजावर तसेच अब्बास थोडगे आदी उपस्थित होते.
दरम्यान मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या ब्रीद वाक्याप्रमाने सर्वच समाजातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सिकंदर फरास यांनी सांगितले











