‘आपले सरकार’ पोर्टलवर रत्नागिरी पोलिसांच्या ७ सेवा ऑनलाइन

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यामुळे नागरिकांना मिळतेय घरबसल्या बसल्या सेवा

रत्नागिरी : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या (ई-गव्हर्नन्स सुधारणा) कृती आराखड्यानुसार रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘आपले सरकार’ पोर्टलवर रत्नागिरी पोलीस दलाच्या एकूण ७ सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष न जाता घरबसल्या विविध परवाने, प्रमाणपत्रे व ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे वेळ, खर्च व अनावश्यक त्रास टळणार आहे.

या सेवांमध्ये ध्वनीक्षेपक परवाना, मनोरंजन कार्यक्रमासाठी ना-हरकत, शोभायात्रा परवानगी, सभा–संमेलन–मिरवणूक परवानगी, हत्यार परवाने व ना-हरकत प्रमाणपत्र, नोकरीसाठी आवश्यक चारीत्र्य पडताळणी तसेच परदेश प्रवासासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

आतापर्यंत ध्वनीक्षेपक परवान्यासाठी ५५९ अर्ज प्राप्त झाले असून ५४३ निकाली काढण्यात आले आहेत. मनोरंजन कार्यक्रमासाठी २७ पैकी २६ अर्ज निकाली काढण्यात आले. शोभायात्रा व सभा–संमेलन परवानगीचे सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. नोकरीसाठी आवश्यक चारीत्र्य पडताळणीसाठी २४,५५४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २१,८८५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

या ऑनलाइन सेवांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

🔹 उपलब्ध ऑनलाइन सेवा

✔️ ध्वनीक्षेपक परवाना

✔️ मनोरंजन कार्यक्रमासाठी ना-हरकत

✔️ शोभायात्रा परवानगी

✔️ सभा, संमेलन, मिरवणूक परवानगी

✔️ हत्यार परवाने व ना-हरकत प्रमाणपत्र

✔️ नोकरीसाठी आवश्यक चारीत्र्य पडताळणी

✔️ परदेश प्रवासासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र

📊 आतापर्यंतची आकडेवारी

🔸 ध्वनीक्षेपक परवाना : ५५९ अर्ज, ५४३ निकाली

🔸 मनोरंजन कार्यक्रम ना-हरकत : २७ अर्ज, २६ निकाली

🔸 शोभायात्रा : ०३ अर्ज, ०३ निकाली

🔸 सभा–संमेलन–मिरवणूक : ०१ अर्ज, ०१ निकाली

🔸 हत्यार परवाने : ४९ अर्ज, ४२ निकाली

🔸 चारीत्र्य पडताळणी : २४,५५४ अर्ज, २१,८८५ निकाली

🔸 परदेश प्रवास परवानगी : ११२ अर्ज, ११२ निकाली

या सुविधांमुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि अनावश्यक फेरफटका टळत असून, पारदर्शक व जलद सेवा देण्याच्या दिशेने रत्नागिरी पोलीस दलाचे हे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.