मालगुंड येथील रिसॉर्टमध्ये कामाला असलेल्या कोल्हापूर येथील कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
मालगुंड येथील रिसॉर्टमध्ये कामाला असलेल्या कोल्हापूर येथील कामगाराचा 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत शुक्रवार 9 जानेवारी रोजी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत विजय कुमार शिंदे (44,रा.वडणगे ता.करविर,जि.कोल्हापूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्याचा सख्खा भाउ सुशिलकुमार शिंदे याने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,शशिकांत शिंदेला दारुचे व्यसन होते. 16 डिसेंबर 2025 पासून तो मालगुंड येथील श्रृतिका सुनिलकासार यांच्या मालकिच्या ‌‘दर्यासारंग‌’ या रिसॉर्टमध्ये रुम सर्व्हिस देण्याचे काम करुन तिथेच रहात होता. दरम्यान, 30 डिसेंबर रोजी शशिकांत शिंदेने दारुच्या नशेत रात्रीचे जेवण न करता तसाच झोपी गेला होता. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा.सुमारास शशिकांत हा नेहमी प्रमाणे उठून रिसॉर्ट समोरच्या समद्रावर फिरुन येउन रुममधे बसलेला होता. त्यानंतर त्याने सकाळी 10 वा. रिसॉर्टच्या मालक श्रृतिका सुनिलकासार यांना आपल्याला कसेतरी होउन अस्वस्थ्ा वाटत असल्याचे सांगितले.
त्यामुळे मालक श्रृतिका सुनिलकासार यांनी शशिकांतला तातडीने प्रथम मालगुंड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला दुपारी 1.15 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना दुपारी 2.50 वा.सुमारास शशिकांतचा मृत्यू झाला. याप्रकरणी 9 जानेवारी रोजी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.