राजापुरकरांकडून निलेश राणेंवर अभिनंदनाचा वर्षाव
नरेंद्र मोहिते, राजापूर
जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात कायमच ठामपणे पाठीशी उभ्या रहाणाऱ्या राणे परिवाराच्या शक्तीची आणि राणे स्टाईलची प्रचिती पुन्हा एकदा राजापुरकरांना आणि जिल्हावासीयांना गुरूवारी आली. महामार्गाचे काम पुर्ण नसतानाही महामार्ग प्रशासनाकडून राजापूर तालुक्यातील हातिवले येथे सुरू असलेली अनधिकृत टोलवसुली विरोधात राजापूरवासीयांसोबत रस्त्यावर उतरत निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत अनधिकृत टोलवसुली स्थगित करण्यास भाग पाडले. आमचा टोलला विरोध नाही, मात्र अगोदर रस्त्याचे काम पुर्ण करा, स्थानिकांच्या मागण्या पुर्ण करा मगच टोलवसुली असेही राणे यांनी ठणकावले. अखेर राणे यांच्या या आक्रमक पावित्र्यापुढे प्रशासन नमले आणि टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली. यानंतर निलेश राणे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षियांनी एकच जल्लोष करत निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा देत परिसर दणाणून सोडला. निलेश राणे यांच्या या एका दणक्याने गेली २२ दिवस सुरू असलेल्या या अनधिकृत टोल वसुली विरोधातील आंदोलनाला ख्ग्ऱ्या अर्थाने यश आले. यानंतर उपस्थित सर्वच राजकिय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. तर सोशल मिडियावर निलेश राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे जीथं राणे तिथं तात्काळ फैसला आणि न्याय याची प्रचिती राजापूरकरांना पुन्हा एकदा आली.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. राजापूर तालुक्यातुन वाटूळ ते तळगाव टाकेवाडी या टप्प्यातही अनेक ठिकाणी काम अपुर्ण आहे. तर जिल्हयात लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, खेड तर पुढे रायगड जिल्हयातही अद्याप काम अपुर्णावस्थेत आहे. मात्र असे असतानाही महामार्ग प्राधिकरणाने सिंधुदुर्ग जिल्हयात ओसरगाव व राजापूर तालुक्यातील हातिवले येथी टोलवसुलीची अधिसूचना प्रसिध्द केली व १ डिसेंबर पासून या दोन्ही टोलनाक्यांवर टोलवसुली करण्याचे जाहिर केले. मात्र सिंधुदुर्गातील टोलवसुलीला सिंधुदुर्ग वासीयांनी तीव्र विरोध केल्याने या ठिकाणी अद्याप टोलवसुली सुरू झालेली नाही.
राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलवसुलीलाही राजापूरातील सर्वच राजकिय पक्षांसह विविध संघटना, वाहतुकदार व स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. रस्ता पुर्ण झालेला नसताना टोलवसुली का असा सवाल उपस्थित करत स्थानिकांना टोलमाफी द्यावी अशीही मागणी केली. मात्र १ डिसेंबर पासून होणारी टोलवसुली ५ डिसेंबर पासून होणार असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक होऊन जोपर्यंत रस्ता पुर्ण होत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली करू नये असे ठरविण्यात आले.
मात्र त्यानंतरही कधी छुप्या पध्दतीने तर कधी उघडपणे ठेकेदाराने टोलवसुली सुरू केली. तर बुधवार 21 पासुन उघडपणे टोलवसुली सुरू करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा सर्वपक्षियांसह संघटनांनी एकत्र येत टोलवसुली करू नये अशी मागणी केली, मात्र ती न जुमानता ठेकेदाराकडून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आली. मग मात्र आता राणेच न्याय देऊ शकतात त्यामुळे निलेश राणेंंच्या कानावर हा विषय घालण्यात आला. निलेश राणे यांनी यापुर्वीच या अनधिकृत टोलवसुलीला विरोध करत जनतेच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र बुधवार २१ डिसेंबर पासून हातिवले टोलनाक्यावर ठेकेदाराकडून टोलवसुली केली जात असल्याची माहिती मिळताच व राजापुरकरांनी संपर्क साधताच सिंधुदुर्गातुन ग्रामपंचायत निवडणूकीची प्रक्रिया संपल्यानंतर आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईत गेलेले निलेश राणे क्षणाचाही विलंब न लावता गुरूवारी राजापुरात दाखल झाले. थेट टोल नाक्यावर धडक देत त्यांनी अनधिकृतपणे सुरू असलेली टोलवसुली बंद पाडली. याला सर्वपक्षीयांसह विविध संघटनांनी साथ देत राणे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला.
ठेकेदारासह महामार्ग विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांसह प्रशासनही दाखल झाले. निलेश राणे यांनी आक्रमपणे जनतेची बाजू मांडत, आमचा टोलला विरोध नाही, पण रस्त्याचे कामच पुर्ण नाही मग टोल वसुली कसली असा खडा सवाल केला. जोपर्यंत काम पुर्ण होत नाही, स्थानिकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली नाही असे ठणकावले. आणि जर तुंम्ही हे मान्य करणार नसाल तर मी सगळया टोलवसुली केबीनना टाळे ठोकतो मग काय करायचे ते करा असा ईशारा दिला. तर जनतेच्या भावना तात्काळ केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, केद्रींय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून कानी घातल्या व टोलवसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली. आणि मग प्रशासनाने नमते घेतले आणि टोलवसुलीला स्थगिती देत असल्याचे सांगितले. यावेळी निलेश राणे यांनी टोलवसुली स्थगित करण्यात आली असून पुढील बैठक होऊन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली होणार नाही निश्चिंत रहा असे जाहिर केले. त्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांनी देखील सर्वपक्षियांसह विविध संघटनांनी दिलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले.
गेले २० दिवस बैठक, निवेदने, ईशारे देऊनही प्रशासन आणि ठेकेदाराने उघडपणे सुरू केलेली टोलवसुली निलेश राणे यांच्या एका दणक्याने थांबली आणि राजापुरकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. सत्तेत असो वा नसो, पद असो वा नसो पण सामान्य जनतेसाठी कायम लढण्याची आणि न्याय मिळवून देण्याची राणे कुटुंबीयांची खासीयत पुन्हा एकदा राजापूरवासीयांनी अनुभवली. जे कुणाला जमले नाही ते निलेश राणेंनी एका तासात करून दाखविले अशा प्रतिक्रीया व्यक्त होत असून सोशल मिडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे ते आले.. त्यांनी पाहिलं.. आणि जिंकल सुध्दा अशा प्रतिक्रीया टोलवसुली स्थगितीनंतर राजापुरात उमटत आहेत.