सर्वांचा आभारी : उपनगराध्यक्ष दिपक पाटकर
मालवण | अमित खोत : मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झालेले शिवसेना नगरसेवक दिपक पाटकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. पक्षनेतृत्वाने मला संधी दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब व शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आशीर्वाद लाभले. त्यासोबत आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संधी दिल्याने सभागृहाने माझी बिनविरोध निवड केली. मी सर्वांचा आभारी आहे.
मालवण शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी कटीबद्ध राहणार आहे. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया असे दिपक पाटकर यांनी सांगितले. दिपक पाटकर यांच्या उपनगराध्यक्ष निवडी नंतर मालवण नगरपरिषद येथे मालवण शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दिपक पाटकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














