वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा येथील प्र क्र. ४ मधील गणेश घाटासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून गणेश घाट मंजूर करण्यात आला,गणेश गटाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन आज शिवसेनेचे पदाधिकारी महिला तालुकाप्रमुख सौ. शितल साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरोडा सरपंच सौ लतिका रेडकर, वेंगुर्ला पंचायत समिती मा.उपसभापती तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री सिद्धेश(भाई) परब, उपसरपंच श्री चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य सौ अनिश्का गोडकर, सदस्य श्री पांडुरंग नाईक, मा. सदस्य श्री बाळा मयेकर, विभाग प्रमुख श्री अमित गावडे, दाजी गावडे, श्रीकृष्ण गावडे, गणेश गोडकर, वैभव मांजरेकर, विठ्ठल परब, नागेश गोडकर, गुरुनाथ गावडे, दत्तराज परब, आदित्य गोडकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.













