मसदे भराडी देवी मंदिर ते प्राथमिक शाळा मंजूर रस्त्याचे भूमिपूजन

मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील मसदे श्री देवी भराडी मंदिर ते प्राथमिक शाळा या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामाचे भूमिपूजन माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या शुभारंभ प्रसंगी कांदळकर यांनी सांगितले की, या रस्त्यासाठी येथील ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी केली होती व येथील जनतेला फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. अखेर आम.निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे. व यापुढेही मसदे गांवच्या ज्या विकास समस्या आहेत त्या पुर्ण केल्या जातील मात्र येथील जनतेने एकसंध राहून व आवश्यक ते सहकार्य करावे असे कांदळकर यांनी आवाहन केले आहे. या वेळी कांदळकर यांच्या सह मसदे चुनवरे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच शमिका वाडकर, माजी सरपंच दत्ताराम ( आपु ) आंबेरकर, माजी सरपंच कमलेश प्रभु, ग्रामपंचायत सदस्य केतकी कमलेश प्रभु, उद्योजक विलास पांजरी, समीर प्रभू, मोहन मसदेकर,दिलीप मसदेकर, संतोष देसाई, ठेकेदार तूषार कांदळकर, ग्रामसेवक महेंद्र मोरे,व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. याच वेळी चुनवरे येथील मंजूर घरकुलाच्या कामाचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.