Breaking:जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार का?

आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई :

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार का, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळासह प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर स्पष्टता मिळण्याची शक्यता असून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र याबाबत आज पत्रकार परिषद घेणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कालबद्ध कार्यक्रम, तयारी तसेच आचारसंहिता लागू करण्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आचारसंहिता लागू झाल्यास विकासकामांचे भूमिपूजन, शासकीय घोषणा, निधीवाटप आणि प्रचारावर निर्बंध येणार असल्याने याचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.