देवबाग समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधाऱा कम रस्त्यासाठी १६ कोटींचा निधी

 

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर ; शिवसेना विभागप्रमुख मंदार लुडबे यांनी खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सागरी अतिक्रमण ग्रस्त देवबाग गावाला वाचवण्यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी सुमारे 158 कोटी निधी देवबाग गावासाठी आमदार निलेश राणे यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतला. त्यानंतर सागरी अतिक्रमण बाधित क्षेत्रात बंधारा उभारणीसाठी आ. राणे यांच्या पाठपुराव्याने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नातुन देवबाग समुद्र किनारी पंढरीनाथ मंदिर ते विंडमिल हॉटेल पर्यंत १००० मीटर बंधारा कम रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश आर. बी चव्हाण यांच्या नावे प्राप्त झालेले आहे.

याबाबत शिवसेनेचे विभागप्रमुख मंदार लुडबे यांनी माहिती दिली असून खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.

या कामाच्या मंजुरीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी देखील प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.