केंद्रशाळा मसुरे नं. १ चा आदर्श उपक्रम : मेढावाडी येथे बांधला वनराई बंधारा

​मसुरे | झुंजार पेडणेकर
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जि.प. केंद्रशाळा मसुरे नं. १ ने मेढावाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

​या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये श्रमदान व जलसंवर्धनाचे संस्कार रुजतील.

​हा बंधारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, पालक श्रीम मयुरी शिंगरे,मुख्याध्यापक श्री. विनोद सातार्डेकर, शिक्षक श्री. विजय सरोदे, गणेश घुगे, सुजाता सुरडकर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभारण्यात आला. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.