पावसाळी अधिवेशनातील व्यस्त कामकाज असताना आमदार नितेश राणे यांनी केवळ जामसांडे देवगड साठी पाणी नाही म्हणुन देवगड गाठले. आपली सत्ता नसतानाही देवगड नगरपंचायतीमध्ये जाऊन पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बैठक घेतली, या बैठकीमध्ये पाणीपुरवठा सभापती कुठे आहेत असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी केला, मात्र त्याचे उत्तर सापडले असून देवगड जामसांडेमध्ये अतिवृष्टी मध्ये पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेचे सोयर सुतक नसून सभापती संतोष तारी हे पावसाळी सहलीमध्ये व्यस्त आहेत त्यांचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत

पाईप फुटल्याने दहिबाव पूरक योजनेतून पाणीपुरवठा बंद पडला आहे हीच परिस्थिती शिरगाव प्रादेशिक योजनेची आहे या योजनेतून गेले तेवीस दिवस पाणीपुरवठा झालेला नाही या योजनेच्या पाईपमध्ये एअर आली असून ठेकेदार ती काढण्यात व्यस्त आहे मात्र फुटलेले पाईप दुरुस्त करण्यासाठी तातडीने काय करावे याचे अंदाजपत्रकही प्रशासनाने तयार केलेले नाही आमदार नितेश राणे यांनी सूचना करतात आपण अंदाजपत्रक तयार करू असे प्रशासनाने सांगितले यावरून पाणीपुरवठा बाबत सत्ताधारी किती जागृत आहेत हे दिसून आले वास्तविक दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार असण्याची गरज होती शेवटी हे सर्व सत्ताधारी पक्षाने करायचे आहे
जनतेत सत्ताधार्यांबाबत तीव्र संताप असून जमत नसेल तर किमान सत्ता तरी सोडा अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत सर्वच बाबतीत अपयशाची आघाडी सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे












