रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथील शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत बी श्रेणीत ४ तर C श्रेणीत ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेत A श्रेणीत ४, बी श्रेणीत ३ तर C श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशालेचे कलाशिक्षक श्री. अनिल सागवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा, तांत्रिक मार्गदर्शन व आत्मविश्वास दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
या उज्वल यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी, शालेय समिती अध्यक्ष श्री. राजन मलुष्टे, संस्था पदाधिकारी तसेच पालकवर्ग यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व विद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पुढील शैक्षणिक व कलाक्षेत्रातील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेच्या या शंभर टक्के निकालामुळे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Home महत्वाच्या बातम्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचा 100 टक्के निकाल












