रत्नागिरी ः प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण मिशन व उपक्रम राबविले आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी मिशन प्रतिसाद हा लोकाभिमुख उपक्रम 10 सप्टेंबर 2025 पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. एकटे राहणारे, दुर्गम भागात वास्तव्यास असलेले व मदतीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिकरत्नागिरी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या वृद्धांची भेट घेऊन तक्रार निवारण करताना पोलीस अधिकारी व अंमलदार,यांना तात्काळ पोलीस सहाय्य उपलब्ध करून देणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.

या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दोन हेल्पलाईन क्रमांक 9684708316 व 8390929100 सुरू करण्यात आले आहेत. तसेच डायल 112 वर प्राप्त होणाऱ्या तक्रारीही मिशन प्रतिसाद कक्षामार्फत नोंदविण्यात येतात. तक्रार प्राप्त होताच संबंधित माहिती त्वरित त्या हद्दीतील पोलीस ठाण्याला कळविण्यात येते. त्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन समस्येचे त्वरित निराकरण करतात.ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याठी कटिबद्ध जिल्ह्यातील दुर्गम व कमी लोकसंख्येच्या खेड्यापाड्यांपर्यंतही पोलीस अधिकारी व अंमलदार पोहोचून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवित आहेत. जिल्हा पोलीस दलाकडून सर्व ज्येष्ठ् नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मिशन प्रतिसाद अंतर्गत उपलब्ध हेल्पलाइन क्रमांकांचा निःसंकोचपणे वापर करावा.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने व प्रभावीपणे सोडविण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल कटिबद्ध आहे. तसेच मिशन प्रतिसाद उपक्रमात कोणतीही अडचण किंवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा तक्रारीचे समाधान झाल्यानंतर बीट अंमलदार व मिशन प्रतिसाद कक्षामार्फत पुन्हा खात्री करूनच तक्रार बंद करण्यात येते. या कक्षासाठी स्वतंत्र चार पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलीअसून सर्व तक्रारींची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवली जाते. या नोंदींचा दैनंदिन आढावा अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घेत आहेत.












