रत्नागिरी ः प्रतिनिधी
गुगल पे व्दारे आपल्या खात्यात 60 हजार रुपये ट्रान्सफर करत फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना मंगळवार 18 जुलै रोजी दुपारी 2.15 ते बुधवार 19 जुलै रोजी सायंकाळी 7 वा.कालाववधीत मिरकरवाडा येथे घडली आहे.
हाफिस असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,फिर्यादी हे कांचन ओशन व्ह्यु अपार्टमेंट मिरकरवाडा येथे राहतात.मंगळवारी फिर्यादी घरीच असताना संशयित हाफिसने फिर्यादीच्या मोबाईलवरुन गुगल पे व्दारे आपल्या खात्यात 59 हजार 900 रुपये ट्रान्सफर केले.ही बाब फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी संशयिताला फोन करुन पैसे परत करण्यास सांगितले.तेव्हा संशयिताने 24 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा करतो असे सांगितले.परंतू 24 तास उलटून गेल्यानंरतही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांनी शनिवार 22 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी हाफिस विरोधात भादंवि कायदाल कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










