राजापूरचे आमदार किरण सामंत यांची उपस्थिती
राजापूर (वार्ताहर): कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शनिवारी शहरानजीकच्या मौजे शीळ येथे वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा मौजे शीळ वारकरी सांप्रदाय मंडळाचे वतीने राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार किरण सामंत, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजू कुरूप, शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, दिपक बेंद्रे, एड. यशवंत कावतकर, अरविंद लांजेकर, योगेश नकाशे आदी उपस्थीत होते.
यावेळी आमदार किरण सामंत यांचाही वारकरी सांप्रदाय मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला.
शीळ येथे राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष आणि शीळ गावचे सुपुत्र रविंद्र नागरेकर यांच्या पुढाकाराने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाचे पाचवे वर्ष होते. दिवसभर हरिपाठ, ह. भ. प. विश्वनाथ उर्फ भाई महाराज गोसावी यांचे प्रवचन, सायंकाळी ह. भ. प. सोनुबुवा कुर्णेकर पायी दिंडी संस्था भांबेड यांचा हरिपाठ तर हर्चे ता. लांजा येथील युवा किर्तनकार ह. भ. प. डॉ. मनोहर गोरे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार निलेश राणे यांनी सायंकाळी या हरिनाम सप्ताहाला भेट दिली व वारकी सांप्रदाय मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अधात्मिक प्रसाराच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शीळ गावचे सरपंच अशोक पेडणेकर, वारकरी सांप्रदाय मंडळाचे विजय बाईत, गोपाळ गोंडाळ, नामदेव नागरेकर, कृष्णा नागरेकर, सुरेश बाईत, रामचंद्र गोंडाळ, गणपत मोंडे, प्रकाश बाईत, प्रकाश भोवड, सहदेव नागरेकर, मनोहर गोंडाळ, कृष्णा गोंडाळ आदींसह वारकरी बांधव उपस्थित होते.













