चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील ओम श्री डुगवेश्वर गणेशवाडी मित्र मंडळ डूगवे यांच्या वतीने गुरुवार २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे सकाळी ८.०० वा.श्रींचा अभिषेक, सकाळी ०९.३० वा.श्री सत्यनारायणाची महापुजा, सकाळी १० ते १२ वा.भजन आणि किर्तन ह.भ.प. शिव चरित्रकार विजयबुवा कदम देवखेरकी चिपळूण, दुपारी १२.०० वा. जन्मकाळ आरती, तीर्थप्रसाद,
दुपारी १ ते ०३ वा. महाप्रसाद,
दुपारी ३ ते ०५ वा. महिला हळदीकुंकु समारंभ, दुपारी ०४ ते ०५ वा. लहान मुलासाठी विविध कार्यक्रम स्पर्धा, सायं. ५.३० ते ०७ वा. सुस्वर भजन डुगवे गणेशवाडी ग्रामस्थ, मुंबई मंडळ,
सायं. ७ ते ०९ वा. श्रीं ची पालखी मिरवणुक सोहळा,
रात्री ९ ते १० वा. सत्कार सोहळा आणि बक्षिस वितरण सोहळा, रात्री १०.३० वा.
साईनाथ नाट्य नमन मंडळ कोंढे, मालवाडी, चिपळूण, यांचा नमनाचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष आणि सरपंच चंद्रकांत तांडकर व स्थानिक, मुंबई, पुणे आणि महिला मंडळाने केले आहे.











