अश्वमेध महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश….

वेंगुर्ले : प्रतिनिधी : वेताळ प्रतिष्ठान, तुळस यांनी अश्वमेध महोत्सवांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
खुल्या गटातील निबंध स्पर्धेत संस्कृती चिपकर हिने द्वितीय, वक्तृत्व स्पर्धेत अमृता नवार हिने उत्तेजनार्थ, मॅरेथॉन – ४ कि.मी.धावणेमध्ये मुलींमधून अलिशा कुबल हिने तृतीय, इंदुजा पेडणेकर हिने पाचवा, साभिनय वेशभूषा स्पर्धेत शालेय गटातून वेदांत नाईक याने प्रथम क्रमांक तसेच समुहनृत्यामध्ये स्कूलच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना अजित केरकर व दीपक बोडेकर सर यांचे, साभिनय वेशभूषा स्पर्धेसाठी प्रथमेश उर्फ भैय्या गुरव व प्रा. वैभव खानोलकर, विश्वास पवार यांचे, समुह नृत्यासाठी शरयू गोसावी व गायत्री चेंदवणकर तर समुहगीतासाठी लक्षाधीश केरकर, मंदार मेस्त्री, आकाश नाईक, नैतिक नाईक यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी पालक दाजी नाईक, सुशांत कुर्ले, सुमन कुर्ले व सुवर्णा भोकरे आदी उपस्थित होते.
सहभागी तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, सचिव रमेश नरसुले, सर्व संस्था कार्यकारिणी पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अश्वमी भिसे यांनी अभिनंदन केले आहे.