ब्राम्हण सहाय्यक सेवा मंडळ, लांजा” तर्फे आयोजित तालुकास्तरीय ब्राम्हण संमेलन संपन्न

लांजा (प्रतिनिधी) ब्राम्हण सहाय्यक सेवा मंडळ, लांजा” तर्फे आयोजित तालुकास्तरीय ब्राम्हण संमेलन शनिवारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय लांजा येथे उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय ब्राम्हण संघ, रत्नागिरीचे अध्यक्ष महेश सप्रे, डॉ ठाकूर -अध्यक्ष, ब्राम्हण सहाय्यक सेवा मंडळ, लांजा, उपाध्यक्ष महेश सप्रे,श्रीपाद बेर्डे, अनुप सरदेसाई तसेच सौ संयोगिता पाध्ये या कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .
सुरूवातीला ज्या थोर मंडळीना देवाज्ञा झाली आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर दिपप्रज्वलन करून आणि त्यानंतर मंत्रोच्चारांच्या मंगल नादात कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.प्रस्ताविक करताना अनुप सरदेसाई यांनी मंडळाचा मुख्य उद्देश, समाजासाठी आखलेल्या पुढील योजना आणि भविष्यात हातात घ्यावयाच्या विविध उपक्रमाचा सुस्पष्ट व प्रेरणादायी आढावा घेतला. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विशेष प्रविण्यासह संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.उद्योग विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या ब्राम्हवृदांपैकी मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ४० वर्षाहून जास्त काळ सहचर्य निभावून आदर्श संसार उभारणाऱ्या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांनी आपल्या कौशल्यातून साकारलेली विविध उत्पादने विक्रीसाठी स्टॉलवर मांडली होती. स्वावलंबनाची, उद्यमशीलतेची ही झलक उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.डॉ सौरभ पाध्ये यांची ही संकल्पना होती.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेश सप्रे यांनी आपल्या जीवनानुभवांच्या आधारे समाजाला दिशा देणारे मोलाचे मार्गदर्शन केले.या नंतर मनोज चांदोरकर यांनी सर्व मान्यवरांचे, उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानले.
या नंतर सिंधुदुर्ग येथील कलाकारांनी सादर केलेला, पूर्णपणे ब्राम्हण सहभागाने नटलेला “दशावतार “कार्यक्रम हा या संमेलनाचा सांस्कृतिक शिखरबिंदू ठरला. परंपरा, भक्ती आणि लोककलेचा हा अद्भुत आविष्कार उपस्थितांच्या मनावर अमूल्य ठसा उमटवून गेला