पाचल शाखा रौप्य महोत्सव सोहळा
वेबसाईट, क्युआर कोड, सुधन गोल्ड योजनेचे लोकार्पण
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी राजापूर शाखा पाचल चा रौप्य महोत्सव सोहळा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पाचल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थेने चालू केलेल्या मोबाईल बँकिंग चा शुभारंभ काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. क्युआर कोड प्रणाली चा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हाचे जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांच्या हस्ते तर संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचा शुभारंभ माजी राज्य मंत्री भाईसाहेब हातणकर यांचा पत्नी माई हातणकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुधन गोल्ड या योजनेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र पाटकर यांनी करून शाखा पाचलचा आर्थिक स्थितीचा लेखाजोका सादर केला. त्यांनतर संस्थेच्या स्थापनेपासून पाचल शाखेतील ज्या ज्या सभासदांनी सहकार्य केले व आज पर्यंत संस्थेत ज्या सभासदांनी निस्वार्थी भावनेने व्यवहार केले, अशा दोनशे पेक्षा जास्त सभासदांना रौप्य उत्सव सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी सहकार क्षेत्रात काकासाहेब करत असलेल्या कार्याबद्दल गौरोवोद्गार काढले. काकासाहेबांचे सहकार क्षेत्रातील विचार हे संपूर्ण राज्यात पोहचणे गरजेचे आहे आणि ते विचार पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
त्यांनतर प्रमुख अतिथी काका कोयटे यांनी राजापूर तालुका कुणबी पतपेढी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले. संस्थेचा ०% एनपीए, ९९ % कर्ज वसुली, त्याच प्रमाणे संस्थेचा असलेला स्वनिधी यावरून संस्था सक्षम असल्याचे दिसून येते. संस्थेने स्वनिधी चे योग्य नियोजन करून त्याची शासनाचे नियमानुसार गुंतवणूक हि तेवढ्याच रकमेचे केलेली आहे. संस्थेने आपले व्यवहार करत असताना सर्व व्यवहार हे आदर्श प्रमाण राखून केले आहे. त्यामुळे सर्व सभासदानी जास्तीत जास्त व्यवहार हे या संस्थेत करावे असे उपस्थित सभासद व हितचिंतक यांना आवाहन केले.
त्यानंतर नुकतेच भारतीय आर्मी मध्ये भरती झालेले शाखा पाचलचे दक्षता कमिटी सदस्य महादेव शिंदे यांचा मुलगा हरिओम शिंदे व शाखा पाचल च्या दक्षता कमिटी सदस्य राधिका मोरे यांचा नातू अक्षय मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर सिधुदुर्ग रत्नागिरी बार असोशीयन अध्यक्ष एस, एम.देसाई यांनी संस्थेशी आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. त्यांनतर नेटविन सिस्टीम चे व्हा. प्रेसिडेंट मसऊद अत्तार यांनी कुणबी सह. पतपेढी आपले वीस वर्ष सॉप्टवेअर वापरत असल्याचे सांगितले संस्था नेहमीच बदलते बँकिंग स्विकारण्यासाठी आग्रही असते जेणेकरून आपल्या सभासदांना आधुनिक सेवा देण्याचा आणखी एक पाउल म्हणजे मोबाईल बँकिंग व क्युआर कोड प्रणाली असे भाषणातून त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच लोकनेते शामराव पेजे यांची जयंती असल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यांनतर उपस्थित काका कोयटे व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे इतर उपस्थित मान्यवराचे पाचल शाखेचे पालक संचालक सुरेश ऐनारकर व संचालक धनेश कोकरे यांनी केले.
या सोहळ्याकरिता लांजा कुणबी विकास पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, ग्रामपंचायत पाचल सरपंच बाबालाल फरास, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, कुणबी मंडळ पाचलचे अध्यक्ष सुरेश बावकर, सचिव सुहास पराडकर, पाचल कुणबी मंडळ सदस्य, संस्थेचे आजी माजी संचालक, शाखा पाचल स्थानिक कमिटी सदस्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, शाखाधिकारी कर्मचारी वृंद पिग्मी एजंट आदी मान्यवर उपस्थित होते. रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त हळदीकुंकू व सहकार मेळावा अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनाजी मासये यांनी केले.












