मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे बॅ. नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी
विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.
प्रारंभी बॅ नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.दीपक भोगटे यानी आपल्या प्रास्ताविकात बॅ नाथ पै सेवांगण तर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला. स्पर्धेचे हे ५१ वे वर्ष असून १८ प्रकारच्या विविध स्पर्धात १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असून २१० विद्यार्थ्याना बक्षीस वितरण होत आहे. १९७५ पासून सातत्याने गेली ५१ वर्ष हा उपक्रम
सुरू आहे त्याबद्दल त्यांनी शिक्षक, विद्यार्थी पालक यांचे आभार मानले.
तसेच प्रमुख पाहुणे दीपक गावडे
हे चार वेळा पुणे महानगर पालिकेत
निवडून आले असून निस्पृह प्रामाणिक
व निष्कलंक चारित्र्याचे आहेत याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. कोकण रेल्वे साठी बॅ नाथ पै यानी आपल्या कारकिर्दीत अथक प्रयत्न केले. उत्कृष्ट संसदपटू म्हणून ते
भारतात प्रसिद्ध होते. सेवांगण त्यांचे विचार जपून ठेवण्याचे काम सातत्याने करीत आहे असे सांगितले.
प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक
दीपक गावडे यानी बॅ नाथ पै यांच्या कार्याचा आढावा घेतला. धर्माचा खरा अर्थ सांगणारी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सर्वानी आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. बॅ नाथ पै यांनी आपल्या अल्पायुष्यात
फार मोठे कार्य केले. त्यांचे विचार जीवंत ठेवण्याचे काम बॅ. नाथ पै सेवांगण सातत्याने करीत आहे यांचे कौतुक वाटते. सेवांगणला माझे कायमच सहकार्य राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली
किशोर शिरोडकर यानी बॅ नाथ पै यांच्या सोबत च्या आठवणी सांगितल्या. आमच्या हृदयातन नाथ पै आहेत
त्यांना जाऊन ५५ वर्ष झाली तरी
त्यांच्या आठवणी पुसल्या जात नाहीत
रीया जांभवडेकर यानी सूत्रसंचालन केले.
गुणवंत विद्यार्थ्याना शैक्षणिक भेटवस्तू व
प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास
एलन डान्टस, दीपक गावडे, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, अर्चना धुत्रे
डगरे मॅडम, अर्जून पेंडूरकर, वीणा म्हाडगुत, खरात सर, मेस्त्री सर, श्रीधर गोंधळी, शोभा म्हाडगुत, जगदिश नलावडे, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, रीया जांभवडेकर, मंगल पराडकर, दिक्षा आमरे, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.









