गावखडी (वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यात डोर्ले येथे लाईनमन नसल्यामुळे ग्रामस्थाची गैरसोय होत आहे. पावसविभागातील जनता विजेच्या लपंडामुळे, अनियमित विजपुरवठयामुळे त्रस्त असते. डोर्ले, शिवार आंबेरे या दोन गावचे काम पाहणारे लाईनमन यांची अचानक बदली करून मोठे नुकसान झाले आहे. याला सर्वस्व जबाबदार पावस महावितरण कंपनी असून यांची वेळीच दखल न घेतल्यास 15ऑगस्ट ला आंदोलन करण्याच्या विचारात ग्रामस्थ आहेत.











