जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर गुहागर मध्ये मोठी राजकीय उलथापालथ

गुहागर  प्रतिनिधी
शिवसेना उप तालुका प्रमुख सुशील उर्फ आग्रे तसेच मुन्ना तावडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
गुहागर प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचे अर्ज भरणे सुरू असतानाच गुहागरमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.भाजप उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
संतोष जैतापकर यांचा सोमवारी चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.
संतोष जैतापकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे असगोली जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे .शिवसेना गुहागर मधून असगोली जिल्हा परिषदेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे