भुईबावड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांना चावा

जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

वैभववाडी | प्रतिनिधी : भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी सकाळी ५ जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे.

सोमवारी सकाळी जयंवती दत्ताराम पांचाळ ऐनारी,रघुनाथ भिकाजी मोहिते ऐनारी, संतोष बापू शेळके भुईबावडा, राजेंद्र रमेश पाथरे तिरवडे, परशुराम राठोड भुईबावडा या पाच जणांचा कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. सर्व जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकावर उपचार सुरु आहेत. तसेच या गावातील कुत्र्यांना ही चावला आहे. यामुळे भुईबावडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र येथील जागृत ग्रामस्थांनी सुरक्षेच्या कारणास्तव पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात आले असल्याचे समजते काही वयोवृद्ध महिला, तरुण अशा समावेश आहे.
तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी केले जात आहे.