२१ ते २३ जानेवारीदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील चाफेड–भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे आयोजन बुधवार दि. २१ ते शुक्रवार दि. २३ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत हळदीकुंकू समारंभ, तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध धार्मिक विधी, अभिषेक व मंत्रपुष्पांजली पार पडणार आहे. दुपारी ११ ते १२ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते १२.३० या वेळेत महाआरती तर दुपारी १२.३० ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ५ ते रात्री १२.३० या वेळेत परिसरातील नामांकित निमंत्रितांची संगीत भजने होणार असून, रात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेत लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर (संचालक: श्री. सिद्धेश कलिंगण) यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी पहाटे ५.३० ते ६ या वेळेत काकडआरती, सकाळी ८ ते १२ या वेळेत उत्तरपूजा व अभिषेक तसेच दुपारी महाप्रसाद होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल परब, उपाध्यक्ष प्रशांत राणे, खजिनदार सचिन परब व सरचिटणीस संतोष भोगले यांनी केले आहे.













