राजापूर प्रतिनिधी :तालुक्यातील धोपेश्वर पंचायत समिती गणातुन महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अभिजीत गुरव यांना भाजपाकडून उमेदवारी जाहिर झाली आहे. बुधवारी गुरव हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तशी माहिती खुद्द अभिजित गुरव यांनी पत्रकारांना दिली आहे.
धोपेश्वर पंचायत समिती गणातुन गुरव यांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली कोदवली गावातील रहिवाशी असलेले अभिजित गुरव हे गेली काही वर्षे भाजपामध्ये कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी भाजपाचे तालुका अध्यक्षपदही भूषविले होते. भाजपाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी कायमच त्यांचा पुढाकार असतो. एक आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना धोपेश्वर गणातुन पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवारी दिली आहे. पक्षाकडून त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला आहे.
यापुर्वीही त्यांनी पुर्वीच्या कोदवली पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविली होती, मात्र त्यावेळी अल्प मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते धोपेश्वर गटातुन जिल्हा परिषद सदस्यपदासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. मात्र महायुतीत धोपेश्वर पंचायत समिती गण हा भाजपाच्या वाटयाला आल्याने त्यांना पक्षाकडून पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
बुधवारी आमदार किरण सामंत यांसह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
Home महत्वाच्या बातम्या धोपेश्वर पंचायत समिती गणातुन भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अभिजीत गुरव यांना भाजपाकडून महायुतीचे उमेदवार...













