तोरसोळे येथे माघी श्री गणेश जयंती उत्सव व श्री गणेश मंदिराचा १८ वा वर्धापनदिन

शिरगाव (प्रतिनिधी):देवगड तालुक्यातील तोरसोळे (मधली वाडी) येथे श्री सिध्दीविनायक सेवा मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे माघ शु. ४, शके १९४७, गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव व श्री गणेश मंदिराचा १८ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता श्री गणेश पूजन व अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री गणेश पालखी मिरवणूक, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती तर दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे.
दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ६ वाजता विविध सुश्राव्य भजने व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून, रात्री ८ वाजता दिंडी भजने होणार आहेत. रात्री १० वाजता श्री गौतमेश्वर नाटक मंडळ (दाभोली, वेंगुर्ले) यांचा “अशी प्रगटली वाराही देवी” हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिध्दीविनायक सेवा मंडळ, तोरसोळे (मधली वाडी) यांनी केले आहे.

सोबत श्रीचे छायाचित्र