लांजा येथील पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा
संतोष कोत्रे
लांजा -: लांजा नगरपंचायतीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याची माहिती लांजा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये चारही जिल्हा परिषदेच्या जागा शिवसेना लढवणार असून आठ पंचायत समिती पैकी सात जागा शिवसेना तर एक जागा ही भाजपाच्या वाट्याला सोडण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लांजा नगरपंचायतीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा महायुती निवडून आणेल असा विश्वास यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये,भाजपा पदाधिकारी चंद्रकांत मांडवकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी यामध्ये सर्वसाधारण असलेल्या गवाणे जिल्हा परिषद गटासाठी संतोष रेवाळे, आसगे गटासाठी सौ मनीषा गणेश लाखण,, भांबेड जिल्हा परिषद गटासाठी सौ विनिता गांगण तर साटवली गटासाठी सौ. लीला घडशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ जणांपैकी सात जागा ही शिवसेना लढत असून एक जागा ही भाजपासाठी सोडण्यात आली आहे. त्यामध्ये आसगे पंचायत समिती गणासाठी सौ. मानसी आंबेकर, वेरवली गणासाठी सौ. साक्षी चव्हाण, गवाणे पंचायत समिती गणासाठी सौ दिपाली साळवी, खानवली गणासाठी यशवंत वाकडे, प्रभानवल्ली गणासाठी उमेश पत्की, साटवली गणासाठी आदेश आंबोळकर ,वाकेड गणासाठी रसिका मेस्त्री यांना उमेदवार जाहीर करण्यात आली असून भांबेड पं.स.ची जागा भाजपला सोडण्यात आली असून या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर यांना उमेदवार देण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, शिवसेनेचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये, भाजपा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, भाजपा तालुकाध्यक्ष विराज हरमले, शिवसेना युवा तालुका अधिकारी राजू धावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.












