सरंद येथे बायोचार खत निर्मिती प्रात्यक्षिक

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे कृषी विभागातर्फे,प्रगतशील शेतकरी श्री संतोष बाळाराम गोटेकर यांच्या शेतावर बायोचार प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आरवली श्रीमती खेडेकर उपस्थित होत्या. त्यांनी बायोचार बनवण्याची पद्धती, त्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी उपस्थित सरंद गावचे प्रगतशील शेतकरी श्री संतोष गोटेकर, गावचे उपसरपंच श्री उमेश पवार, श्री ऋषिकेश गोटेकर, श्री संदीप गोटेकर, मावळंगे गावचे सरपंच श्री प्रकाश वीर, आंबव गावचे उपसरपंच श्री मंगेश मांडवकर, श्री बाबू जड्यार , कु. नितीन गोटेकर, श्री अर्जुन गोटेकर, श्री निखिल गोटेकर, श्रीमंती सुवर्णा गोटेकर, श्रीमंती वनिता गोटेकर ,श्रीमंती संपदा गोटेकर, यादि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीमती मनीषा खेडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती श्रद्धा टाकळे, सरंद गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री भानुदास दौंड उपस्थित होते.
यावेळी बायोचार खत निर्मिती – सविस्तर व सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली.
बायोचार हे शेतीसाठी उपयुक्त असे कार्बनयुक्त सेंद्रिय खत आहे. हे जमिनीची सुपीकता वाढवते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते व उत्पादन सुद्धा वाढवत असल्याचे कृषी विभागाने मार्गदर्शनात सांगितले.