कोंडमळा येथील जागृती हुमणे झाल्या लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील कोंडमळा, माजी पंचायत समिती सदस्या जयश्री जयवंत हुमणे आणि माजी केंद्रप्रमुख जयवंत हुमणे यांची कन्या जागृती हुमणे या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून ते महाराष्ट्रातून २५७व्या रॅंकने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची सहाय्यक अभियोक्ता पदावर (क्लास वन ऑफिसर) निवड झाली आहे.

अतिशय अथक प्रयत्न करून जागृतीने हे यश संपादन केले आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी २५७ रँकने उत्तीर्ण झाली आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि जागृतीने केलेले परिश्रम यामुळेच तिला यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रेरणादायी नव्या उज्ज्वल वाटचालीसाठी कुणबी समाज उन्नती संघ मुंबई, संघ शाखा चिपळूण, कुणबी युवा चिपळूण व मित्रमंडळी यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहे.