ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावच्या धार्मिक क्षेत्रातील सातेरी रवळनाथ देवस्थान मधील महत्वाची व्यक्ति असणाऱ्या एकनाथ अंकुश गावकर वय 57 यांचे गोवा बांबूळी येथे आकस्मिक निधन झाले. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांची तब्बेत बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले मात्र तिथंही त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हतं यातच शुक्रवारी पहाटे त्यांचं दुःखद निधन झाले.एकनाथ गावकर यांना देवस्थान मध्ये मोठा मान होता.त्यांच्या जाण्याने देवस्थान मधील एक जाणकर आणि महत्वाची व्यक्ती गेल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.मनमिळावू स्वभावामुळे सर्वांशी आपुलकीने बोलणे तसेच अडी अडचणीना धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी अनेक माणसं जोडली होती.त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पच्छात बायको, दोन मुलगे,भाऊ,बहीण,भावजय पुतण्या असा मोठा परिवार आहे.येथील प्रकाश गावकर, संदीप व दीपक गावकर यांचे ते भाऊ, उदय व अभिजित यांचे ते वडील तर प्रथमेश व प्रमोद गावकर यांचे काका होत.












