सावंतवाडी :
माडखोल धवडकी येथील रहिवाशी सुशिला गंगाराम चिले (८४) यांचे मंगळवारी २० जानेवारी रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत चिले कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे निवृत्त वाहन चालक रघुनाथ चिले तसेच सांगली केंद्र शाळा नं.१ मुख्याध्यापक बाबली चिले यांच्या त्या मातोश्री तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे निवृत्त व्यवस्थापक नामदेव गवळी आणि सोनुर्ली येथील दत्ताराम केळुसकर यांच्या त्या सासू होत.









