मालवणात ८१ उमेदवारी अर्ज दाखल

६ जिल्हापरिषद जागासाठी २८ : १२ पंचायत समिती जागांसाठी ५३ अर्ज ; आज होणार छानणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद सहा सदस्य आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २८ आणि पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी मालवण तहसील कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी होती. गुरुवारी सकाळी 11 वाजता अर्ज छानणी होणार आहे.

दुपारी तीन वाजेपूर्वी जे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज भरणा कक्षात दाखल होते. त्यांना टोकण देऊन सायंकाळी उशिरा पर्यत टोकाण दिलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.

भाजपा, शिवसेना युती

मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या अधिकृत सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना पक्षाकडून आडवली माडली, आचरा, पेंडूर, वायरी भूतनाथ, सुकळवाड या जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपा कडून मसुरे-मर्डे जिप मतदार संघात उमेदवारी दाखल करण्यात आला. तर पंचायत समिती 12 जागापैकी वायरी भूतनाथ , कोळंब, चिंदर, आडवली-मालडी, सुकळवाड, वराड या सहा पंचायत समिती मतदार संघातून भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर शिरवंडे, आचरा, मसुरे मर्डे, पोईप, पेंडूर, कुंभारमाठ या सहा जागांवर शिवसेनेने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठा कडून तसेच काही ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकूण 81 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.