उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना युती,उबाठा, काँग्रेस,मनसे बसपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज

जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल

संतोष कोत्रे
लांजा -: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज बुधवारी २१ जानेवारी रोजी असलेल्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.‌ आज बुधवारी सकाळपासूनच शिवसेना युती, उबाठा, राष्ट्रीय काँग्रेस, बसपा, रिपाई, मनसे, वंचित या पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपले उमेदवारी दाखल करण्यात आले.‌ तर अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आज बुधवारी २१ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.‌ त्यामुळे लांजा तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय गोंधळ वा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‌
जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी आज बुधवारी शिवसेना भाजपा युतीकडून ४, शिवसेना उबाठा पक्षाकडून ६, रिपाई पक्षाकडून १, बसपा १, काँग्रेस १ असे एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या आठ जागांसाठी शिवसेना भाजपा युती ८, उद्धव बाळासाहेब ठाकरे ८, काँग्रेस पक्षाकडून ३, मनसे १, रिपाई १, बसपा ४, वंचित १ आणि अपक्ष पाच असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शिवसेना भाजपा युतीकडून गवाणे जिल्हा परिषद गटातून संतोष रेवाळे, आसगे गटातून सौ. मनीषा गणेश लाखण,, भांबेड जिल्हा परिषद गटातून सौ विनिता गांगण तर साटवली गटातून सौ. लीला घडशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले .त्याचप्रमाणे आसगे पंचायत समिती गणातून सौ. मानसी आंबेकर, वेरवली गणातून सौ. साक्षी चव्हाण, गवाणे पंचायत समिती गणातून सौ दिपाली साळवी, खानवली गणातून यशवंत वाकडे, प्रभानवल्ली गणातून उमेश पत्की, साटवली गणातून आदेश आंबोळकर ,वाकेड गणातून रसिका मेस्त्री, भांबेड पं.स तून शैलेश खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भांबेड जि पगटातून अचला हरिश्चंद्र विश्वासराव, आसगे जि प गटातून अनन्या अभिजीत राजेशिर्के, गवाणे जि प गटातून चेतन शांताराम दळवी, आणि साटवली जि.प.गटातून दक्षता अनंत राजापकर यांनी उमेदवारी दाखल केले.‌ त्याचप्रमाणे पंचायत समिती गणामध्ये भांबेड पंचायत समिती गणातून युवराज हांदे प्रभानवल्ली पं.स.गणातून राजेंद्र विश्राम घडशी, आसगे गणातून असावरी किशोर मांडवकर, वेरवली गणातून नीलिमा अलविंद जाधव, गवाणेतून पायल प्रशांत साळवी, खानवली गणातून लक्ष्मण सोनू मोर्ये, साटवली गणातून रमेश रामभाऊ कदम आणि वाकेड गणातून स्नेहा सहदेव वापार्डेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्याचप्रमाणे गवाणे जि प गटातून रिपब्लिकन सेनेकडून अनिरुद्ध कांबळे, तर वेरवली पंचायत समिती गणातून वंदना कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून साटवली जिल्हा परिषद गटातून मनीषा मनोज जाधव यांनी उमेदवारी दाखल केला असून साटवली पं.स. सगळ्यतून पिलाजी तुकाराम विचारे, खानवली गणातून प्रथमेश रमेश भोजे आणि आसगे गणातून सौ.भारती प्रभाकर जाधव यांनी उमेदवारी दाखल केले. मनसेकडून भांबेड पंचायत समिती गणातून किरण प्रभाकर रेवाळे यांनी उमेदवारी दाखल केला. बसपाकडून खानवली पं.स.गणातून चंद्रकांत गीतये, साटवली गणातून उज्वल बाळकृष्ण पवार, आसगे पं.स.गटा तून श्रावणी सचिन कांबळे आणि प्रभानवल्ली गणातून आनंदा बाबू कांबळे यांनी उमेदवारी दाखल केले.
त्याचप्रमाणे पंचायत समिती गणासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला मध्ये प्रभानवल्ली पंचायत समिती गणातून संकेत शांताराम घाग, भांबेड गणातून सुरेंद्र सुभाष खामकर, सचिन पुंडलिक बेर्डे तर खानवली गणातून संजय वासुदेव रेवाळे आणि गवाणे पंचायत समिती गणनातून तन्वी दीपक दाभोळकर यांनी उमेदवारी दाखल केले.‌

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज बुधवार सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांनी गर्दी केली होती. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार किरण सामंत यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, युवा सेना तालुकाधिकारी राजू धावणे, शिवसेना पदाधिकारी गणेश लाखण, प्रसन्न शेट्ये, महेश खामकर, योगेश वाघदरे , भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, महिला जिल्हा संघटक उल्का विश्वासराव, लक्ष्मण मोर्ये , युवराज हांदे, संजय नवाथे, तालुका संघटिका पूर्वा मुळे, शहर प्रमुख मोहन तोडकरी, सचिन लिंगायत, बाबा धावणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे आदी उपस्थित होते.